संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत शासन परिपत्रकानुसार आयोजित करावयाचे उपक्रम. सदर उपक्रमांचे आयोजन शालेय स्तरावर दि. २६ नोव्हेंबर, २०२४ ते दि.२६ जानेवारी, २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार निबंध - Click Here
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव 'घर घर संविधान" साजरा करणे संदर्भात कळविले आहे.
घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत शालेय स्तरावर खालील उपक्रमांचे आयोजन दि. २६ नोव्हेंबर, २०२४ ते दि.२६ जानेवारी, २०२५ या कालावधीत करावे.
- शाळा/महाविद्यालय / वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे, (स्वरुप - कायम स्वरूपी लावण्यात यावी.)
- शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका/उद्देशिकचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे. (स्वरुप - कायम स्वरूपी लावण्यात यावी.)
- शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करवून देणे. (शालेय ग्रंथालयात इंग्रजी / मराठी किमान ५ प्रती ठेवण्यात याव्यात.)
- भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे, जसे, निर्मिती, निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषत्ता, कर्तव्ये यावर व्याख्यान (किमान ६० ते ९० मिनिटे - तज्ञ मार्गदर्शक किंवा शाळेतील शिक्षक यांनी माहिती देणे आवश्यक आहे.)
- विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, हक्क, आणि कर्तव्ये यांवर मार्गदर्शन करणे. (तज्ञ मार्गदर्शक किंवा शाळेतील शिक्षक यांनी माहिती देणे आवश्यक आहे.)
- कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये समजावून सांगणे. (विषय तज्ज्ञांचा एक गट तयार करून। त्यांनी संविधानासंबंधित फलक, पोस्टर व प्रदर्शन प्रथमतः तपासावे व प्रमाणित करावे)
- संविधान मुल्ये यावर पथनाट्य तयार करणे. (विषय तज्ज्ञांचा एक गट तयार करून। त्यांनी संविधानासंबंधित फलक, पोस्टर व प्रदर्शन प्रथमतः तपासावे व प्रमाणित करावे)
- शाळा/महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्यांवर फलक, पोस्टर, आणि प्रदर्शन आयोजित करणे. (विषय तज्ज्ञांचा एक गट तयार करून। त्यांनी संविधानासंबंधित फलक, पोस्टर व प्रदर्शन प्रथमतः तपासावे व प्रमाणित करावे)
- संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश करावा,
- संविधानावर आधारित उपक्रम निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करणे,
- प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण, (जसे देशभक्तिपर गाणी, नाटक, आणि नृत्य) (विषय तज्ज्ञांचा एक गट तयार करून। त्यांनी संविधानासंबंधित फलक, पोस्टर व प्रदर्शन प्रथमतः तपासावे व प्रमाणित करावे)
0 Comments